Tuesday, March 8, 2011

स्त्री आजकाल

  आजपर्यंत, अगदी आत्तापर्यंत ही अखिल स्त्री जात, स्त्री वर किती अन्याय होत आहे, स्त्री किती बंदिवासात आहे, आपण त्याना किती कष्ट दिले आहेत वगैरे वगैरे म्हणून टाहो फोडत असते. अरे... आमचा कोणी विचार करणार आहे का नाही. कसला लिंगभेद? मला मान्य आहे की काही वर्षापूर्वीपर्यंत खरच स्त्री ही अबला, बंदीनी म्हणजे अलका कुबल टाइप होती... पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आणि मला सांगा लहानपणापासून आपल्यावर ह्या स्त्री जातीमुळेकिती अन्याय झालाय. आमच्या शाळेत मास्तर आम्ही थोडी काही चुक केली की लगेच छडीने फोडून काढायचे आणि मूलीना नुसती वॉर्निंग देऊन सोडून द्यायचे. आणि समजा माझ्यासारख्या एखाद्या क्रांतीकारी मुलाने या अन्यायाविरुद्ध आवाज केला की आधी माझ्या कानाखाली दोन आवाज काढून मग मुलींच्या डोक्यात शाबासकीची थाप मारल्यासारखी चापट मारायचे. त्याचा मुलींवर तर काही परिणाम व्हायचा नाहीच पण त्यांच्या डोक्यातल्या दोन चार उवा मात्र मरत असतील. बर ते तर ते पुन्हा आम्ही मार खाताना ह्या मुली आमच्याकडे बघून दात काढायच्या... बर ह्या टाहो काय म्हणून फोडतात तर आम्हाला स्वातंत्र्य दिल जात नाही. आता अजुन कशाच स्वातंत्र द्यायच रहिलय तुम्हाला. स्त्री पुरूष समानता मानता ना तुम्ही ? मग आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला? नौकरी मागायला जा.. तिथही याना आरक्षण, बसमधे जा, रेल्वेत जा,मंदिरात जा, कुठही जा यांच्या साठी आरक्षित जागा आहेतच. बर एक काळ खरच असा होता की ह्यांच्याकड पाहून वाटायच की खरच ह्या मुली आहेत. पण आजकालच्या मुलींकडे पाहून खरच वाटत का की ह्यांच्यावर एखादी कविता करावी, ह्यांचावर मनापासून प्रेम कराव... सर्वस्व विसरून प्रेम करनारी मूल आज खूप आहेत पण एकाच मुलावर विशुद्ध प्रेम करनारी मुलगी एखादीच. लता मंगेशकर, किरण बेदी, राजमाता जिजाउ यांचा आदर्श सांगितला की ह्याना तो साचा वाटतो. कारण मल्लिका शेरावत, राखी सावंत ही त्यांची प्रेरणास्थान.
बर एक आदर्श पुरूष घडवणारी स्त्रिच असते ना? समाज घडवणारी स्त्रिच असते ना? आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी तीचीच ना? मग आजचा जो भ्रष्ट समाज आहे तो घडवला कुणी?
  आज देशाची अवस्था इतकी वाईट असताना का नाही एखादा शिवाजी घडत? पहिले शिवाजी राजे याच मराठी मातीत जन्मले ना? पण शिवाजी घडायला जिजामाता लागतात. त्या काळात तितक्या प्रतिकूल परिस्थीत शिवाजी घडवणार्‍या जिजाउ पण एक स्त्रिच होत्या ना? मग आज तर तुम्हाला एवढे अधिकार दिलेत. एवढ शिक्षण दिल जातय. मग नेमक काय कमी पडतय तुम्हाला?
 रामायण घडल ते एका स्त्रीमूळेच.. महाभारत घडवणारी पण एक स्त्रिच होती.....   आणि शिवबा घडवणारी पण एक स्त्रिच होती. आणि आजचा हा समाज घडवलाय तो पण स्त्रीनेच. स्त्रीयानो दिलेल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग करा. पश्चिमात्यांनी चघळुण फेकलेल्या  गोष्टींच अनुकरण करताना आपण भारतीय आहोत हे विसरू नका.....

Wednesday, November 10, 2010

गावाकडच्या गोष्टी-2

   दूसरी गोष्ट जी  गजाला अतिशय प्रिय होती ती म्हणजे गाड़ी अर्थात बाइक. "माझ्या आयुष्यात येणा-या, समृद्ध बापांच्या विविधतेने नटलेल्या मुलीना गाडीवर फिरवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन" अशी जणू काही
प्रतिज्ञाच  केली होती गजानं . गजा गाड़ी शिकला आणि गावातल्या लोकानी आपापले लेकर रस्त्यावर खेळू देण बंद केल. गजाच घर हे त्याच्या सुदैवान आणि गावक-यांच्या दुर्दैवान गावाच्या बाहेर असल्यान गजाची गाड़ी दिवसातून ५-२५ वेळा गावातून फिरायची. गब्बरसिंगच्या घोड्याच्या आवाज ऐकून जसे रामपुरवासी घाबरायचे तस गजाच्या गाडीचा आवाज दुरून जरी आला तरी लोक आपापले लेकर घरात घेउन जायचे. गजाची गाडीची ही हौस पराकोटीलाच नाही तर "पराअब्जाला"जाउन पोचली होती.
   एकदा आमच्या गावात रात्रीच्या वेळी एक म्हातारी वारली. आता सकाळी तर माती करायची आणि ह्या वेळेला ही बातमी बाहेरगावच्या सोय-या धाय-याना कशी कळवावी म्हणून मंडळी चिंता करत बसली होती. तेवढ्यात रामायणतल्या मारूतीने समुद्र ओलांडून जाण्याची तयारी दाखवल्याच्या आवेशात गजा गाडीवर एक रात्रीत पन्चक्रोशितिल सगळ्या गावात जावून ती ब्रेकिंग न्यूज़ देण्याची तयारी दाखवायचा. पण "गजाची धाव ही गावच्या फाटया पर्यंतच" असल्यान सर्वानी गजाचा तो प्रस्ताव बहुमतानं  फेटाळुन लावला. म्हणून मग गजा एवढा चेहरा पाडून बसला की नविन आलेले पाहुने गजाच्याच बाजूला येउन बसू लागले.
     तर असा हा गजा जेंव्हा प्रेमात पडला, अर्थात प्रेमात पडला म्हणन त्याच्या बाबतीत योग्य ठरणार नाही. कारण प्रेमात "पडतात" ते तुमच्या आमच्यासारखे सामान्यजन. गजा कधी प्रेमात पडला नाही किंवा समोरच्या व्यक्तीला कधी त्यान पडू दिल नाही. त्याच आस झाल की गजाच ग्रामसेवक होण्याच स्वप्न जेंव्हा भंग पावल तेंव्हा गजाची गाड़ी ११ वि एक १२ वि वर आली.
त्याला १२ विला ८० % मिळाले यात गजाला फ़क्त लिहिता-वाचता येत एवढाच त्याचा हात होता . बाकि सगळी त्या परीक्षा केंद्राची कृपा होती जिथून त्यान परीक्षा दिली होती. नवसाला हमखास पावना-या दैवतेप्रमाने त्या कॉपी सेण्टर म्हणून (सु?)प्रस्सिध असलेल्या  कॉलेजचा लौकिक होता. तिथून परीक्षा दिलेल्या आणि देना-या विद्यार्थ्यांच ते all time favourite अस श्रद्धास्थान होत. तर मग ह्या ८० % वर गजाला D.ed  ला सहज admission भेटल. आणि मग आपली तीसरी हौस पूर्ण करायला त्याला खरया अर्थान scope मिळाला. 
    
 

   "डी.एड लाच हाय.बाप डॉक्टरय. फुल लाइन देती आपल्याला." गजा मला सांगत होता.
" मंग? पुढी?"
 "मंग काय मंग. आता तीला फ़क्त सांगायचच  राहिलय."

 काही दिवसानी मी त्याला विचारल, " मंग. काय मनत्यात Madam ?"
    " आर काय सांगू तुला? तीनच मला propose केल नं !! "
 मग फोनफोनी सुरु झाली. तीला माझ्यासमोर फोन वर बोलताना गजा माझ्याकड आसा काही पहायचा की काही वेळान तो मला "आज मेरे पास गाड़ी है.मोबाइल है. लड़की भी है. तुम्हारे पास क्या है?" असा प्रश्न विचारतो का काय अशी भीती वाटायची.
   

   "आज तीला रूमवर घेउन गेलतो"
 "काय सांगायलास" माझ्या डोळ्यातले आश्चर्याचे भाव पाहून गजाला चेव चढला.
 " तुझी शप्पत" आस म्हणून स्वताच्याच  गळयाला त्यान हात लावला.  
  "ती एकटीच आलती?"
 "आर मंग. मी सांगीतलच होत एकटी ये मनुन"
 "मंग र? पुढी काय झालं?" माझा हा प्रश्न किती मुर्खपनाचा आहे आसं पाहत गजा म्हणाला,
 "पुढी काय आस्तया?.............."

    
      खुप दिवसानी आज राजा .  गावाकड आला होता.राजापन आमच्याच ग्रुप मधला. पण बाहेरगावी असतो. मी राजा आणि गजा   शेताकड़ जाणार्‍या त्या पाउलवाटेवरून गजाची स्टोरी ऐकत चाललो होतो.
  "तुज काय बाबा. सोपयं. पोरगीबी कास्ट मधलीच. बाप हुंडाबी भरपूर देतय." मी गजाला मधेच छेडल.
 "अं ! लग्न करीत असतेत का यड्या?"
 " मंग?"
"आर काय गम्मतय का काय हाय. आं?"
गजाच आणि त्या मुलीच एकमेकांवर खर प्रेम असून देखिल ते इतक्या सहज भेटलेत आणि त्यांच लग्न जमन देखिल किती सोप आहे. खरच. किती नशीबवान आहे गजा. अशी काहीशी आमची समजूत होती. पण गजा मात्र आम्हाला एकावर एक धक्का फ्री  देत होता.
"म्हणजे तुझ तिच्यावर प्रेम नाही का?" इतका वेळ शांत असलेला राजा पहिल्यांदाच बोलला.
"आर कशाच आलय प्रेम. तसल प्रेम न बिम कै करीत नस्तोय आपण"
"आर त्या पोरीचं काय? तिचा कै विचार?"
"अं ! तीच बी कैच नाही र. त्या दिवशी रूमवरच्या भेटीनंतर तीन माझा फोनच उच्चल्ला नाही २-४ दिवस. मंग एका दिवशी दुसरया नंबर वरून फोन लावला तर मनली,
"आता काय बोलायचय. तुमाला जे पाहिजे ते भेटल. मला जे पाहिजे ते भेटल."
  एक मुलगी अशी बोलू शकते ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
 "आता तिन आमचा मास्तरच धरलाय."


काही दिवसानी गजाचा फोन आला. गजा, त्याचा एक मित्र आणि त्यांच्या वर्गातल्या दोन मुली असा ग्रुप स्कॉर्पियो गाड़ी घेउन गेले होते चक्क एका बिअर बार वर. आणि मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्या मुली फुल आउट होईपर्यंत पित होत्या म्हणे. आता पुण्या-मुंबईच्या मानान ही गोष्ट जरी खूप छोटी असली तरी आमच्या मराठवाड्यात दोन भावी शिक्षिका एकमेकीना आग्रह करत दारू पित बसल्या होत्या ही गोष्ट नुसती ऐकन्यासाठी देखिल मन घट्ट कराव लागत.
दुसरया दिवशी सकाळी गजाचा  त्यांना  माझ्यासमोर फ़ोन 
"मंग madam उतरली का नाइ रात्रीची?"
"नाही ओ सर. पण तुम्ही मात्र पुरेपुर फायदा उठवला की?"
डि एड चे विद्यार्थी हे भावी शिक्षक असल्यान आतापासूनच त्यानी एकमेकाना सर आणि  मैडम म्हनाव ह्या एका नियमाच मात्र  ते १०० % पालन करीत होते. गजाची कारकीर्द दिवसेंदिवस वाढत होती. आता गजा एकाच वेळी ३-३ मुली हँडल तर करत होताच पण त्याला कंटाळा आलेल्या मुलींचे नंबर तो आपल्या मित्राना द्यायचा आणि त्यांचीपण सोय करायचा.
  

       राजा आज बरयाच दिवसानी गावाकडं  आला होता.आम्ही तिघे पुन्हा त्याच वाटेवरून शेताला निघालोत. गजाला मधेच  कुठल्यातरी मुलीचा फोन आला आणि मग आम्हाला, "तुमि व्हा पुढी. मी आलोच." आस म्हणून एका झाडाखाली त्यान तळ ठोकला. आम्ही पुढ निघालोत. राजानं आयुष्यात फ़क्त एकाच मुलीवर जिवापाड प्रेम केल होत. कळायला लागल तेंव्हापासून. पण शेवटी प्रेम मग ते खर असो व खोट ते नशिबातच असाव लागत. का  झाल कस झाल ते माहित नाही पण त्या  मुलीच लग्न ह्याच्या डोळ्यादेखत लागल. असेच अनेक किस्से आहेत.
     हे अस  का होत? माझ्या दुसरया एका मित्रान ज्य़ा मुलीवर प्रेम केल त्या मुलीची आणि त्याची १० वर्षात एकदाही भेट होऊ नये?
आणि इथ ह्यांच्या रोज भेटी. घंटाघंटा फोन वर बोलन. आयुष्यभर एकाच मुलीवर प्रेम करून आणि तीच लग्न झाल्यावर तिच्याच आठवणी मनात  घेउन फिरणारा माझा मित्र खरा का एका वर्षात ३ पोरी बदलणारा गजा खरा?
 हे सगळ मी राजाला बोललो तेंव्हा तो सुरुवातीला seriously घेतच नव्हता पण शेवटी मी विषय खुपच ताणून धरल्यावर तो बोलता झाला.
    " तू म्हणतोयस की हे अस का व्हाव? प्रत्येक प्रेम भंग झालेल्या माणसाला कधीतरी हा प्रश्न पडतोच. पण हा प्रश्न अजुन तरी अनुत्तरितच आहे. कहिजन म्हणत असतील की, प्रेम खर असल्यास काहीही झाल तरी मिळतच. तुमच्यातच guts नसतील. तुम्ही प्रयत्नच केले नसतील. पण मग लैला-मजनू पासून ते देवदास पर्यंत प्रेमाच प्रतिक मानल्या जाना-या यापैकी कुणालाच त्यांच प्रेम का नाही  मिळाल? आणि म्हणून ते प्रेम खर नव्हत,  किंवा त्यांच एकमेकांवर प्रेमच नव्हत  ते  अस म्हणता येइल का? 
 एवढ कशाला कृष्णाचच उदाहरण घे. कृष्णाच्या आणि राधेच्या प्रेमाच्या कथा आपण लहानपनापासून ऐकतो.पण त्यांच लग्न झालेल कधी ऐकलय? मग काय त्यांचपण  प्रेम अयशस्वी म्हनायच का? प्रेम हे मिळाल तर ठीकच पण जरी नाही मिळाल तरी त्याच्या आठवणी शेवटपर्यंत  आणि त्यानंतरदेखिल मागे उरतात.  तस नसत तर कृष्णाला इतक्या बायका असून देखिल आजही त्याच नाव राधेबरोबरच जोडल गेल नसत. ह्यातच राधेच्या प्रेमाचा खरा विजय आहे. आयुष्यात एकदाही कृष्णाची भेट न होता देखिल त्याच्या प्रेमात पडणारी मीरा काय  वेडी होती?
     प्रेमाची भावना जितकी पवित्र असते तितकीच प्रेमात मिळालेल्या  दुखाची. आणि तितक्याच पवित्र असतात त्या आठवणी. आणि पवित्र गोष्टी जतन करन खुप अवघड असत.त्या जतन करायला अवघड जातात आणि म्हनुनच मग मन दुखी होत.
 प्रेम हे कधीच आणि कोणीच विसरु शकत नाही. प्रत्येकजन एकांतात त्या आठवनींना  उजाळा देत असतो. त्या क्षणी त्याच्याही मनाची तीच अवस्था झालेली असते जशी कृष्णाला राधेची आठवण झाल्यावर त्याची झाली असेल, जशी सीता हरवल्यावर रामाची झाली असेल किंवा मीराबाईची  कृष्णाला  भजनं गाताना झाली असेल. त्या व्यक्तीचं मन हे त्या महान परंपरेचा एक भाग  झालेलं असतं.आणि म्हनुनच त्याच्या नकळत ते  दुखात देखिल सुखावून जातं.
      "राहिला गजाचा विषय. तर त्याच देखिल खर आहे.प्रेम होण्यासाठी भावनांची पोच तिथवर असावी लागते.त्याची नाही म्हनुनच तो सुखी आहे.  आपला जन्म गेला एकाच पोरीच्या माग  फिरण्यात. आणि तो एकाच वेळी ३-३ मुलीना फिरवतोय. आणि पाठीमाग ना कुठल्या emotional attachments , ना कुठल्या आठवणी. त्याला समजतं तेवढ्या गोष्टीतून तो आनंद घेतोय आणि आपल्याला समजतात त्या गोष्टीतून आपण दुःख घेतोय.
      शेवटी अज्ञानात समाधान असत ते अस."
                         गजा बराच पाठीमाग राहिला होता.त्याचा कॉल  अजुन सुरूच होता................

Monday, November 1, 2010

!! अश्रु !!

 सुखात असतो जवळ तुझ्या, दुखात मात्र दूर जाइन
 पण वचन मी देतो, जाता जाता दुःख थोड़े वाहून नेइन
 दुःखाचे समीकरण जेंव्हा तुला शब्दात मांडता येणार नाही
 कथा तुझ्या व्यथेची समजुन कोणीच घेणार नाही
तेंव्हा मात्र येइल कंठ तुझा दाटून
 हलकासा पाझर तुझ्या डोळ्यांना फुटून,
 मी येइल भेटीस  घेइल दुःख वाटुन
 मी येइल भेटीस घेइल दुःख वाटुन.
                                                    ----------Dinesh D

Sunday, October 31, 2010

गावाकडच्या गोष्टी part 1

       आमच्या गावात सुरुवातीला ज्य़ा वेळेस   मोबाइल फ़ोन ची एंट्री झाली त्यावेळेस त्याचा प्रचार करण्याच     काम राज्यात राज्य सरकारण आणि आमच्या गावात आमच्या "गजा " ने व्यवस्थित पार पाडल होत. आमच्या    गजाला सगळ्यात प्रिय आशा गोष्टी तीन. एक म्हणजे मोबाइल, दूसरी म्हणजे गाड़ी आणि तीसरी म्हणजे.................. ?  ती नंतर सांगेन.
          गजा त्या काळी agri चा डिप्लोमा करायचा. १० वि नंतर ११ वि १२ विला कट मारून गजान direct  agri ला एडमिशन घेतल ते "मी ग्रामसेवक होणारच" असा निश्चय करुन. गजा सकाळी :१५ च्या गाडीन आपल्या कॉलेजला जायला बाहेर पडायचा त्यावेळी त्याची ऐट पाहण्या सारखी असायची. कड़क इस्त्री केलेला कधीकाळी पांढरा असावा असा शर्ट, त्याच्याखाली तशीच कड़क इस्त्री केलेली निळी  पैंट, पायात घातलेले बूट हे एके काळी त्यांचे आजोबा वापरायचे तो पॉलिश चा ब्रश पाण्यात बुडवून पॉलिश केलेले. पाठीवर कॉलेज कुमार टाकतात तशी एक बैग टाकुन चालताना गजा  जेंव्हा त्या बूटा कड़े पहायचा तेंव्हा त्या बूटांची चमक ही बूटा ऐवजी गजा च्या डोळ्यात दिसायची.
    मोबाइल च्या बाबतीत सांगायच झाल तर आमच्या गावात त्या वेळी फ़क्त सरकारी कार्डला म्हणजे बीएसएनएल लाच रेंज असायची. असायची म्हणजे आणावी लागायची. मग ती रेंज   यावी म्हणून गावातले लोक लाइट चोरन्यासाठी तारेवर आकडा टाकताना  देखिल जेवढी तारेवरची कसरत करायचे नाहीत तेवढी करायला लागले. त्यासाठी गच्ची, गच्चिचा कठडा, झाडावर आणि गावातल्या पडक्या बुरुजावर आशा शक्य तितक्या उंच ठिकाणी जावून बसायाला लागले. पण आमचा गजा? आमच्या गजाला मात्र गावातल्या कोरड्या विहिरीत जरी उभा केला असता तरी त्यान तित पण  रेंज आणून दाखविली असती. कोणत्या भागात कुठला उमेदवार उभा केला म्हणजे निवडून येइल हे जस पक्षातल्या "पक्ष श्रेष्ठी" का काय म्हणतात त्याना नेमक माहित तसाच आमच्या गजा ला गावात कोणत्या area मधे कोणत्या पोसिशन मधे उभा राहून, मोबाइल नेमका किती angle मधे धरावा म्हणजे त्यास रेंज येइल हे जाननारा फ़क्त गजा हाच जानता राजा गावात होता.   त्याचा अभ्यासाच तेवढा दांडगा होता .
  मोबाइल च्या ringtone  बदलण्यापासून  ते एखाद्याच्या मोबाइलची आवडलेली battery  बदलण्यापर्यंतच्या सगळ्या कला गजा ला अवगत होत्या. गजा गावातून जाऊ लागला आणि एखादा नविन मोबाइल घेतलेल्या माणसाने त्याला बघितल की, ओळखीचा डॉक्टर भेटल्या नंतर  नसलेल दुखन सांगुन त्याच्याकडून फुकटात गोळ्या लिहून घेतल्याच समाधान पदरी पाडून घ्याव तस तो मानुस लगेच मोबाइल पुढ करत " आर गजा, ह्याला बघ बर जरा, फ़ोन लावल्यास आवाज कमी आल्या सारखा वाटायलायगजाला काय एवढच पाहिजे असत. एखाद्या ज्योतिष्याच्या हातात एखाद्या सुन्दर बाईचा हात आल्यास  तोदेखिल जेवढा निरखत बसनार नाही  त्यापेक्षा जास्त एकाग्रतेंन गजा तो फ़ोन चेक करायचा. मग आपल्या दिनेश नावाच्या एक रिकामटेकडया मित्राला फ़ोन लावून आवाज खरच कमी येतोय का याची खत्री करायचा. त्यानंतर मग कुठलीतरी बटन दाबल्यासारखी करून पुन्हा मग आवाज वाढला का म्हणून अजुन - कॉल करायचा. शेवटी भिक नको पण कुत्रा आवर म्हणल्यासारख, आर आवाज कमी येऊ दे पण तुझे कॉल आवर असा चेहरा करून तो मानुस  गजा कड़े बघू लागतो तेंव्हा कुठे मग गजा तो मोबाइल, "आता बगा  आवाज कसा येतय ते" आस मोठ्या  आत्मविश्वासांन सांगुन परत करायचा.
        नंतर नंतर मग मोबाइल च्या कीमतीबरोबर कॉल रेट देखिल कमी व्ह्यायला लागले तेंव्हा मात्र लोकाना रामराज्य आल्या सारख  वाटायला लागल. स्वातंत्र्य प्राप्ति नंतर ही अशी एकाच लोकांच्या रोजच्या वापरातली गोष्ट होती की जिच्या कीमती चक्क कमी होत होत्या. बीचा-या  भारतीय नागरिकाना ह्याची सवय नव्हती हो. एकेकाळी मोबाइल ही  प्रतिष्ठेची निशानी मानली जायची. पण आता हीच प्रतिष्ठा जेंव्हा सामान्य माणसाच्या खिशात आली तेंव्हा मात्र तिची प्रतिष्ठा जावून ती देखिल सामान्य झाली. आहो शेवटी एखादी गोष्ट श्रीमंत माणसाजवळ असते तेंव्हाच  तिची किम्मत, तिची प्रतिष्ठा. तीच गोष्ट गरीबा जवळ आली की तिची ती किम्मत प्रतिष्ठा आपोआप कमी कशी होते ते मला काही समजत नाही.
     असो. तर असा हा मोबाइल स्वस्त झाल्यान गजाला देखिल त्याचा त्याचा स्पेशल असा एक मोबाइल मिळाला. मग काय नविन प्रेमात पडलेल्या मुलासारखी गजाची अवस्था झाली. फ्री मेसेज पैक, night pack , caller tune  , talk time  , balance , call rate  असे शब्द  रात्रंदिवस गजाच्या जिभेवर खेळायला लागलेपण फ़ोन वर बोलायला पैसे लगत असल्यान ती हौस गजा मिस कॉल देऊन भागवायाचा. पण समोरचा मानुस तरी किती वेळा reply  करणार हो. मग  अशा बीकट संकटात गजाला एक महामार्ग सापडला. कस्टमर केयर. झाले. गजा मग आपल्याच काय गावातल्या भेटल त्या माणसाच्या फ़ोन वरुन कस्टमर केयर ला फ़ोन लावायचा. बर फ़ोन लावायचा तोही मोक्याच्या ठिकाणाहून. म्हणजे मारुतीचा पार, बस स्टैंड, चावडी, किंवा आशिक महादु चौक. त्यामुळ गजा च्या आजुबाजुला चार पोर अपोआअप जमा व्ह्यायची. फ़ोन लागला आणि तिकडून, " हेल्लो, धिस इस अमित, हाउ मे आय अस्सिस्ट यु सर?" असा आवाज आला की गजा लगेच फ़ोन कट करायचा. पुन्हा redial  मग जेंव्हा पलीकडून, " हेल्लो गुड एविनिंग सर, धिस इस कल्पना ,पूजा , रीता, सरिता, बबिता.... आसा आवाज आला की लगेच गजा खुश होउन,".... आं हेल्लो मैडम, ते मी सावरगाव हुन गजा बोलायलोय... मग  जस काय तिकडून ह्याला ओळख दिली त्या पोरीन आसे हावभाव करून, "हा, हा  तर ते मी काय म्हनू लागलो की ते.मला का नै ......... " आस बोलत बोलत कॉल पूर्ण करायचा. एक दिवशी रात्रि तर गजा चक्क झोपितच उसनायाला लागला, " हेल्लो मैडम मी.... , ....मला ते   night    चे रेट कमी करायसाठी  कै स्कीम हाय का...?
       तर असा हा आमचा गजा जेंव्हा प्रेमात पडला तेंव्हा.......


                                                   ..................  To be  contd .

Saturday, October 30, 2010

सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे

  या आधीही बहुतेक भाऊसाहेबांच्या या कविता सागळयानि वाचलेल्या असतील तरीही,
   
सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे |१|
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो
संमानितो हासू तसे या आसवा सम्मानितो |२|
जाणतो अंति अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे |३|
मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे |४|
आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे |५|


कफ़न माझे दूर करुनी
पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात नाही पाहिला
बघुनी हे माझेच आसू, थांबले गालावारी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता मी वाटले, शोकार्णवी बुडतील ते
श्रद्धांजली तर जागोजागी, वाटले देतील ते
थोडे जरी का दुःख माझे, असते कुणाला वाटले
जळण्यात सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तो, मानुला इतुकाच मी
कळलेच ना कोणा कसा, कफणात रडलो मी
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकिती प्रेतास का ते, तेंव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हां, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रुंचा मला
हाय....ती सारी चिताही,गेली विझोनी शेवटी
जळण्यातही सरणात पुरते, भाग्य नव्हते शेवटी
जळण्यातही सरणात पुरते, भाग्य नव्हते शेवटी...



आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू
अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू
आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे
आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुधे

याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू
मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू

बोललो रडलास तुही, हरवता सीता तुझी
रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी?

ओशाळला ऐकून आली, सारी स्म्रुती त्यला पुन्हा
भगवानही मी काय सन्गू, माझ्या पुढे रडला पुन्हा

आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये
प्रार्थुनी म्हणतो कसा, संगू नको कोणास हे

बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी
राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी

रडन्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी
भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी

सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला
होत जसा युद्धात त्याने,कुंतीसुता सांगितला

बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला
पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, आद्याप नव्हता पाहिला.


               ------------- भाउसाहेब पाटनकर