Saturday, October 30, 2010

सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे

  या आधीही बहुतेक भाऊसाहेबांच्या या कविता सागळयानि वाचलेल्या असतील तरीही,
   
सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे |१|
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो
संमानितो हासू तसे या आसवा सम्मानितो |२|
जाणतो अंति अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे |३|
मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे |४|
आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे |५|


कफ़न माझे दूर करुनी
पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात नाही पाहिला
बघुनी हे माझेच आसू, थांबले गालावारी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता मी वाटले, शोकार्णवी बुडतील ते
श्रद्धांजली तर जागोजागी, वाटले देतील ते
थोडे जरी का दुःख माझे, असते कुणाला वाटले
जळण्यात सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तो, मानुला इतुकाच मी
कळलेच ना कोणा कसा, कफणात रडलो मी
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकिती प्रेतास का ते, तेंव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हां, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रुंचा मला
हाय....ती सारी चिताही,गेली विझोनी शेवटी
जळण्यातही सरणात पुरते, भाग्य नव्हते शेवटी
जळण्यातही सरणात पुरते, भाग्य नव्हते शेवटी...



आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू
अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू
आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे
आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुधे

याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू
मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू

बोललो रडलास तुही, हरवता सीता तुझी
रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी?

ओशाळला ऐकून आली, सारी स्म्रुती त्यला पुन्हा
भगवानही मी काय सन्गू, माझ्या पुढे रडला पुन्हा

आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये
प्रार्थुनी म्हणतो कसा, संगू नको कोणास हे

बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी
राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी

रडन्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी
भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी

सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला
होत जसा युद्धात त्याने,कुंतीसुता सांगितला

बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला
पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, आद्याप नव्हता पाहिला.


               ------------- भाउसाहेब पाटनकर

No comments:

Post a Comment