Sunday, October 31, 2010

गावाकडच्या गोष्टी part 1

       आमच्या गावात सुरुवातीला ज्य़ा वेळेस   मोबाइल फ़ोन ची एंट्री झाली त्यावेळेस त्याचा प्रचार करण्याच     काम राज्यात राज्य सरकारण आणि आमच्या गावात आमच्या "गजा " ने व्यवस्थित पार पाडल होत. आमच्या    गजाला सगळ्यात प्रिय आशा गोष्टी तीन. एक म्हणजे मोबाइल, दूसरी म्हणजे गाड़ी आणि तीसरी म्हणजे.................. ?  ती नंतर सांगेन.
          गजा त्या काळी agri चा डिप्लोमा करायचा. १० वि नंतर ११ वि १२ विला कट मारून गजान direct  agri ला एडमिशन घेतल ते "मी ग्रामसेवक होणारच" असा निश्चय करुन. गजा सकाळी :१५ च्या गाडीन आपल्या कॉलेजला जायला बाहेर पडायचा त्यावेळी त्याची ऐट पाहण्या सारखी असायची. कड़क इस्त्री केलेला कधीकाळी पांढरा असावा असा शर्ट, त्याच्याखाली तशीच कड़क इस्त्री केलेली निळी  पैंट, पायात घातलेले बूट हे एके काळी त्यांचे आजोबा वापरायचे तो पॉलिश चा ब्रश पाण्यात बुडवून पॉलिश केलेले. पाठीवर कॉलेज कुमार टाकतात तशी एक बैग टाकुन चालताना गजा  जेंव्हा त्या बूटा कड़े पहायचा तेंव्हा त्या बूटांची चमक ही बूटा ऐवजी गजा च्या डोळ्यात दिसायची.
    मोबाइल च्या बाबतीत सांगायच झाल तर आमच्या गावात त्या वेळी फ़क्त सरकारी कार्डला म्हणजे बीएसएनएल लाच रेंज असायची. असायची म्हणजे आणावी लागायची. मग ती रेंज   यावी म्हणून गावातले लोक लाइट चोरन्यासाठी तारेवर आकडा टाकताना  देखिल जेवढी तारेवरची कसरत करायचे नाहीत तेवढी करायला लागले. त्यासाठी गच्ची, गच्चिचा कठडा, झाडावर आणि गावातल्या पडक्या बुरुजावर आशा शक्य तितक्या उंच ठिकाणी जावून बसायाला लागले. पण आमचा गजा? आमच्या गजाला मात्र गावातल्या कोरड्या विहिरीत जरी उभा केला असता तरी त्यान तित पण  रेंज आणून दाखविली असती. कोणत्या भागात कुठला उमेदवार उभा केला म्हणजे निवडून येइल हे जस पक्षातल्या "पक्ष श्रेष्ठी" का काय म्हणतात त्याना नेमक माहित तसाच आमच्या गजा ला गावात कोणत्या area मधे कोणत्या पोसिशन मधे उभा राहून, मोबाइल नेमका किती angle मधे धरावा म्हणजे त्यास रेंज येइल हे जाननारा फ़क्त गजा हाच जानता राजा गावात होता.   त्याचा अभ्यासाच तेवढा दांडगा होता .
  मोबाइल च्या ringtone  बदलण्यापासून  ते एखाद्याच्या मोबाइलची आवडलेली battery  बदलण्यापर्यंतच्या सगळ्या कला गजा ला अवगत होत्या. गजा गावातून जाऊ लागला आणि एखादा नविन मोबाइल घेतलेल्या माणसाने त्याला बघितल की, ओळखीचा डॉक्टर भेटल्या नंतर  नसलेल दुखन सांगुन त्याच्याकडून फुकटात गोळ्या लिहून घेतल्याच समाधान पदरी पाडून घ्याव तस तो मानुस लगेच मोबाइल पुढ करत " आर गजा, ह्याला बघ बर जरा, फ़ोन लावल्यास आवाज कमी आल्या सारखा वाटायलायगजाला काय एवढच पाहिजे असत. एखाद्या ज्योतिष्याच्या हातात एखाद्या सुन्दर बाईचा हात आल्यास  तोदेखिल जेवढा निरखत बसनार नाही  त्यापेक्षा जास्त एकाग्रतेंन गजा तो फ़ोन चेक करायचा. मग आपल्या दिनेश नावाच्या एक रिकामटेकडया मित्राला फ़ोन लावून आवाज खरच कमी येतोय का याची खत्री करायचा. त्यानंतर मग कुठलीतरी बटन दाबल्यासारखी करून पुन्हा मग आवाज वाढला का म्हणून अजुन - कॉल करायचा. शेवटी भिक नको पण कुत्रा आवर म्हणल्यासारख, आर आवाज कमी येऊ दे पण तुझे कॉल आवर असा चेहरा करून तो मानुस  गजा कड़े बघू लागतो तेंव्हा कुठे मग गजा तो मोबाइल, "आता बगा  आवाज कसा येतय ते" आस मोठ्या  आत्मविश्वासांन सांगुन परत करायचा.
        नंतर नंतर मग मोबाइल च्या कीमतीबरोबर कॉल रेट देखिल कमी व्ह्यायला लागले तेंव्हा मात्र लोकाना रामराज्य आल्या सारख  वाटायला लागल. स्वातंत्र्य प्राप्ति नंतर ही अशी एकाच लोकांच्या रोजच्या वापरातली गोष्ट होती की जिच्या कीमती चक्क कमी होत होत्या. बीचा-या  भारतीय नागरिकाना ह्याची सवय नव्हती हो. एकेकाळी मोबाइल ही  प्रतिष्ठेची निशानी मानली जायची. पण आता हीच प्रतिष्ठा जेंव्हा सामान्य माणसाच्या खिशात आली तेंव्हा मात्र तिची प्रतिष्ठा जावून ती देखिल सामान्य झाली. आहो शेवटी एखादी गोष्ट श्रीमंत माणसाजवळ असते तेंव्हाच  तिची किम्मत, तिची प्रतिष्ठा. तीच गोष्ट गरीबा जवळ आली की तिची ती किम्मत प्रतिष्ठा आपोआप कमी कशी होते ते मला काही समजत नाही.
     असो. तर असा हा मोबाइल स्वस्त झाल्यान गजाला देखिल त्याचा त्याचा स्पेशल असा एक मोबाइल मिळाला. मग काय नविन प्रेमात पडलेल्या मुलासारखी गजाची अवस्था झाली. फ्री मेसेज पैक, night pack , caller tune  , talk time  , balance , call rate  असे शब्द  रात्रंदिवस गजाच्या जिभेवर खेळायला लागलेपण फ़ोन वर बोलायला पैसे लगत असल्यान ती हौस गजा मिस कॉल देऊन भागवायाचा. पण समोरचा मानुस तरी किती वेळा reply  करणार हो. मग  अशा बीकट संकटात गजाला एक महामार्ग सापडला. कस्टमर केयर. झाले. गजा मग आपल्याच काय गावातल्या भेटल त्या माणसाच्या फ़ोन वरुन कस्टमर केयर ला फ़ोन लावायचा. बर फ़ोन लावायचा तोही मोक्याच्या ठिकाणाहून. म्हणजे मारुतीचा पार, बस स्टैंड, चावडी, किंवा आशिक महादु चौक. त्यामुळ गजा च्या आजुबाजुला चार पोर अपोआअप जमा व्ह्यायची. फ़ोन लागला आणि तिकडून, " हेल्लो, धिस इस अमित, हाउ मे आय अस्सिस्ट यु सर?" असा आवाज आला की गजा लगेच फ़ोन कट करायचा. पुन्हा redial  मग जेंव्हा पलीकडून, " हेल्लो गुड एविनिंग सर, धिस इस कल्पना ,पूजा , रीता, सरिता, बबिता.... आसा आवाज आला की लगेच गजा खुश होउन,".... आं हेल्लो मैडम, ते मी सावरगाव हुन गजा बोलायलोय... मग  जस काय तिकडून ह्याला ओळख दिली त्या पोरीन आसे हावभाव करून, "हा, हा  तर ते मी काय म्हनू लागलो की ते.मला का नै ......... " आस बोलत बोलत कॉल पूर्ण करायचा. एक दिवशी रात्रि तर गजा चक्क झोपितच उसनायाला लागला, " हेल्लो मैडम मी.... , ....मला ते   night    चे रेट कमी करायसाठी  कै स्कीम हाय का...?
       तर असा हा आमचा गजा जेंव्हा प्रेमात पडला तेंव्हा.......


                                                   ..................  To be  contd .

No comments:

Post a Comment